बाजार समिती विषयी

कृषी उत्पन्न बाजार समिती, औसा

औसा कृषी उत्पन्न बाजार समिती ची स्थापना दि. 12/10/1982 रोजी झाली व खरेदी विक्रीचा प्रत्यक्ष व्यवहार दि. 9/1/1983 रोजी समितीचे शिल्पकार तत्कालीन सहकार मंत्री , तथा महाराष्ट्राचे कर्तबगार माजी मुख्यमंत्री मा. श्री. विलासराव देशमुख यांच्या शुभ हस्ते झाला.
औसा कृषी उत्पन्न बाजार समिती चे कार्यक्षेत्र संपूर्ण औसा तालुका असून किल्लारी आणि उजनी अशा दोन उपबाजार पेठ आहेत.

सभापती, योगीराज पाटील व उपसभापती, संतोष सोमवंशी यांच्या मार्गदर्शनामुळे व पुढाकारामुळे औसा बाजारसमिती काही वर्षापासून पूर्णत: डिजिटल झाली आहे. बाजार समितीचे सर्व व्यवहार व कामकाज आता सॉफ्टवेअर वर होत आहेत . बाजार फीस आकारणी व वसुली , सौदा व बाजार भाव , शेतकरी व हिशोब पट्टी नोंदणी अशा अनेक गोष्टी आता सॉफ्टवेअर च्या मदतीने होत आहेत.

खास शेतकरी बांधवासाठी My APMC - माझी बाजारसमिती नावाचे मोबाईल ऍप विकसित केले आहे. या ऍप मध्ये शेतकऱ्यांना बाजारभाव, चालू घडामोडी , बातम्या, व्यापारी यादी, हवामान अंदाज व कृषि सल्ला इत्यादीची माहिती मिळते.